Posts

Showing posts from April, 2024

मराठीतील प्रसिद्ध लेखक - विनोबा भावे

Image
बालपण आणि शिक्षण                 वडील श्री. नरहरी शंभूराव भावे व आई सौ. रुक्मिणी याच्या पोटी एका धर्मनिष्ठ चित्पावन ब्राह्मण कुटुंबात आचार्य विनोबा भावे यांचा जन्म, दि. ११ सप्टेंबर १८९५ रोजी महाराष्ट्रातील पेण जिल्ह्यातील घगोडे गावात झाला वडील बडोदा राज्यात कपडा-तंत्रज्ञ होते. विनोबाचे पाळण्यातील नाव विनायक; पण विन्या, विनय, आचार्य विनोबा भावे, सत विनोबा भावे व ‘बाबा’ हीसुद्धा त्याची प्रचलित नावे होती. तीन भाऊ व एक बहीण होती. आजोबा शंभूराव उदारमतवादी असून स्पृश्यास्पृश्यांना न मानणारे होते. ते शिवभक्त होते. हेच विचार सुरुवातीपासून विनोबामध्ये होते. विनोबांची आई अतिशय धार्मिक असून नेहमी संतवाणी गुणगुणत असे. तिच्याच सांगण्यावरून विनोबांनी इ. स. १९३०-३१ मध्ये संस्कृत गीतेचा मराठीमध्ये पद्यानुवाद केला. तो ‘गीताई गीता माता’ नावाने प्रसिद्ध आहे. त्यांच्या आईचे निधन १९१८ मध्ये झाले. विनोबांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले. इ. स. १९१३ मध्ये बडिलांजवळ बडोद्याला राहून त्यांनी मॅट्रिक पास केले व इंटरमीडिएटला प्रवेश घेतला. त्यांना अत्यंत कुशाग्र बुद्धी होती, जब...

मराठीतील प्रसिद्ध लेखक - प्रल्हाद केशव अत्रे

Image
  प्रल्हाद केशव अत्रे   ऊर्फ   आचार्य अत्रे   (ऑगस्ट १३ ,  इ . स १८९८   -  जून १३ ,  इ.स.१९६९ ) हे  मराठीतील  नावाजलेले  लेखक, कवी ,  नाटककार ,  संपादक ,  चित्रपट  निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी व वक्ते होते. ते महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या  संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील  प्रमुख नेते होते. प्रल्हाद केशव अत्रे प्रल्हाद केशव अत्रे जन्म नाव प्रल्हाद केशव अत्रे टोपणनाव केशवकुमार जन्म १३ ऑगस्ट १८९८  मृत्यू १३ जून १९६९ आचार्य अत्र्यांच्या घणाघाती भाषणांमुळेच संयुक्त महाराष्ट्र मिळाला असे मानले जाते. अत्रे यांचे बाळासाहेब ठाकरे यांच्याशी जाहीर वाद होते.  जन्म व बालपण आचार्य अत्रे यांचा जन्म १३ ऑगस्ट, १८९८ रोजी पुणे जिल्ह्यातील सासवड जवळील कोडित खुर्द या गावी देशस्थ ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील लिपिक होते आणि काही काळासाठी सासवड नगरपालिकेचे सचिव होते आणि त्यांचे काका एमईएस वाघिरे हायस्कूल सासवड येथे शिक्षक होते. सासवडच्या एमईएस वाघिरे हायस्कूलमधून त्यांनी प्राथम...

मराठीतील प्रसिद्ध लेखक - साने गुरुजी

Image
  साने गुरुजी:   (जन्म : २४ डिसेंबर १८९९; - ११ जून १९५०) हे मराठीतले एक श्रेष्ठ गांधीवादी शिक्षक, समाजसुधारक आणि प्रतिभावंत लेखक होते. पांडुरंग सदाशिव साने साने गुरुजींचा जन्म कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. त्या ठिकाणी त्यांचे वडील कोर्टाचे काम करीत असत. कोर्टाचे घराणे साधारणतः वैभवसंपन्न व श्रीमंत समजले जाते व त्यांच्या आजोबांच्या वेळची परिस्थिती तशी होती ही. पण त्यांच्या वडिलांच्या, सदाशिवरावांच्या वेळेपासून मात्र घराण्याची आर्थिक स्थिती घसरत गेली. ती इतकी की, सदाशिवरावांचे घरदारही जप्तीत नाहीसे झाले. अशा रितीने बडे घर पण पोकळ वासा झालेल्या या घराण्यात २४ डिसेंबर, इ.स. १८९९ रोजी पांडुरंग सदाशिवांचा जन्म झाला. त्यांच्यावर त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव पडला होता. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवनविकास झाला. त्यानी इंग्रजी साहित्यामध्ये एम. ए. ही उच्च पदवी मिळवली होती. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील प्रताप हायस्कूल येथे शिक्षक म्हणून सहा वर्षे (१९२४ ते १९३०) न...