मराठीतील प्रसिद्ध लेखक - प्रल्हाद केशव अत्रे
प्रल्हाद केशव अत्रे ऊर्फ आचार्य अत्रे (ऑगस्ट १३, इ . स १८९८ - जून १३, इ.स.१९६९) हे मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी व वक्ते होते. ते महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुख नेते होते.
आचार्य अत्र्यांच्या घणाघाती भाषणांमुळेच संयुक्त महाराष्ट्र मिळाला असे मानले जाते. अत्रे यांचे बाळासाहेब ठाकरे यांच्याशी जाहीर वाद होते.
जन्म व बालपण
आचार्य अत्रे यांचा जन्म १३ ऑगस्ट, १८९८ रोजी पुणे जिल्ह्यातील सासवड जवळील कोडित खुर्द या गावी देशस्थ ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील लिपिक होते आणि काही काळासाठी सासवड नगरपालिकेचे सचिव होते आणि त्यांचे काका एमईएस वाघिरे हायस्कूल सासवड येथे शिक्षक होते. सासवडच्या एमईएस वाघिरे हायस्कूलमधून त्यांनी प्राथमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. १९१९ मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी मॅट्रिक पूर्ण केले. पुणे विद्यापीठातून त्यांनी कला शाखेची पदवी पूर्ण केली. पदवीनंतर अत्रे यांनी शाळेत शिक्षक म्हणून काम केले. अत्रे यांनी १९२८ मध्ये लंडन विद्यापीठातून टी.डी. (शिक्षक पदविका) केले.भारतात परत येण्यापूर्वी त्यांनी सिरिल बर्ट यांच्या हाताखाली प्रायोगिक मानसशास्त्राचा अभ्यास केला आणि हॅरो येथे अध्यापन केले.
संस्था
आचार्य अत्रे यांच्या स्मरणार्थ त्यांचे नाव असलेल्या अनेक संस्था स्थापन झाल्या. त्यांतली काही या :-
आचार्य अत्रे कट्टा, कांदिवली(पश्चिम), मुंबई
आचार्य अत्रे कट्टा सांस्कृतिक मंडळ, ठाणे
आचार्य अत्रे कन्या कॉलेज, पुरंदर (पुणे जिल्हा)
आचार्य अत्रे नाट्यगृह, पिंपरी (पुणे)
आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, सासवड (पुरंदर तालुका-पुणे जिल्हा)
आचार्य अत्रे (यांचा भव्य) पुतळा, वरळी (मुंबई) (पुतळ्याची उंची ३४ फूट)
आचार्य अत्रे यांचा पुतळा, आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन, सासवड (पुणे जिल्हा). हाच चार फूट उंचीचा पुतळा पूर्वी मुंबईत वरळी येथे होता.
आचार्य अत्रे प्रतिष्ठान, पुणे
आचार्य अत्रे प्रतिष्ठान, पुरंदर (पुणे जिल्हा)
आचार्य अत्रे सभागृह, पिंपरी (पुणे)
आचार्य अत्रे सभागृह, पुणे (उद्घाटन २९ मार्च १९८१)
आचार्य अत्रे (वार्षिक) साहित्य संमेलन, सासवड
सासवड नगरपालिकेने बांधलेले आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन, सासवड (पुणे जिल्हा)
आचार्य अत्रे स्मारक समिती, मुंबई. (स्मारकाची सर्व नियोजित कामे पूर्ण झाल्याने फेब्रुवारी २०१२ मध्ये ही समिती बरखास्त करण्यात आली.)
आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठान, पुणे ४११०१६.
अध्यापन
मुंबईत पहिले सहा महिने सॅंढर्स्ट हायस्कूलमध्ये इंग्रजी व गणित शिकवले, व नंतर रॉबर्ट मनी स्कूलमध्ये एक महिना वर्गशिक्षक व त्यानंतर फोर्टमधल्या न्यू स्कूल (भरडा न्यू हायस्कूल) मध्ये संस्कृत शिक्षक म्हणून नोकरी. पुण्याला कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत १८ वर्षे मुख्याध्यापक म्हणून लौकिक मिळवला व शाळेचा मोठा विस्तार केला. त्यावेळी त्यांना फक्त ३५ रुपये पगार होता. ही शाळा अत्र्यांच्या नाट्यलेखनाची, समाजसेवेची प्रयोगशाळाच होती. जातिभेदाच्या भिंती फोडण्याचा मंत्र अत्र्यांना या शाळेतच मिळाला.
जून १९२४ साली मुंबईच्या सरकारी ट्रेनिंग कॉलेजमध्ये शिक्षणशास्त्राचे प्रशिक्षण घेऊन बी. टी. परीक्षेत वर्गात प्रथम आले व त्यानंतर १९२७ ते १९२८ सालच्या दरम्यान इंग्लंडला टीचर्स डिप्लोमा मिळवला. पुण्यात राजा धनराज गिरजी व मुलींची आगरकर हायस्कूल यांची स्थापना केली. प्राथमिक शाळेसाठी "नवयुग वाचनमाला" व दुय्यम शाळेसाठी "अरुण वाचनमाला" ह्या दोन क्रमिक पुस्तकांच्या माला लिहिल्या. १९३७ साली पुणे नगरपालिकेत निवडून आल्यानंतर शिक्षकांसाठी गांधी ट्रेनिंग कॉलेज काढले.
शाळांसाठी क्रमिक पुस्तके
आचार्य अत्र्यांनी मराठी भाषेत विपुल लेखन केले असून त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. त्यांनी आणि शंकर केशव कानेटकर (कवी गिरीश) यांनी संपादित केलेली अरुण वाचनमाला नावाची मराठीची क्रमिक पुस्तके शाळेच्या इंग्रजी पहिली ते इंग्रजी पाचवी (हल्लीची पाचवी ते नववी)च्या अभ्यासक्रमांत होती, सन १९३४ साली निघालेल्या या क्रमिक पुस्तकांसारखी सुरेख पुस्तके त्यापूर्वी आणि त्यानंतर कधीही निघाली नाहीत, असे शिक्षकांचे आणि पालकांचे मत आहे. ही पुस्तके पहायला मिळणेही अशक्यप्राय झाल्याने, डिंपल प्रकाशनाने या पुस्तकांची नवीन पुनर्मुद्रित आवृत्ती आचार्य अत्रे यांच्या ११९ व्या जयंतीनिमित्त १३ ऑगस्ट २०१७ रोजी बाजारात आणली आहे. आचार्य अत्रे यांचे नवयुग मराठा साप्ताहिकाचा पहिला अंक १९४० २१ जानेवारी रोजी प्रकाशित झाला.
आचार्य अत्रे आणि गिरीश दोघेही हाडाचे द्रष्टे शिक्षक होते. त्यावेळी ते अनुक्रमे कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे हायस्कूल आणि न्यू इंग्लिश स्कूल, पुणे येथे मराठीचे अध्यापक होते. अत्रे तर लंडनहून शिक्षणशास्त्रातील उच्च पदविका घेऊन परतले होते; आणि शाळेचे मुख्याध्यापक होते. तेव्हा अशा जाणकारांच्या अनुभवातून ही पुस्तके तयार झाली आणि एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे अवघ्या शिक्षणक्षेत्राला दिशादर्शकाचे काम करू लागली. २०१७ सालीही या पुस्तकांतील कल्पना कालसुसंगत असल्याचे जाणवते. पुस्तकांच्या प्रस्तावनेत उल्लेख केल्याप्रमाणे ही पुस्तके आधुनिक भाषा-शिक्षणाची व अध्यापनशास्त्राची तत्त्वे लक्षात घेऊन तयार केली आहेत. पुस्तकांची रचना (Design) करताना कला आणि वाङ्मय हा मुख्य दृष्टिकोन ठेवला आहे. पुस्तके मनोरंजक करण्याच्या प्रयत्नात फार सोपी होतात आणि शैक्षणिकदृष्ट्या निरुपयोगी ठरतात. ‘मनोरंजकत्व म्हणजे सुलभत्व नव्हे!’ गद्य-पद्य लेखनातील विविध फुलोरे, छटा आणि तऱ्हा यांचा मनोज्ञ संगम या पुस्तकांत अनुभवायला मिळेल. सारांश, राष्ट्रीय, महाराष्ट्रीय आणि मानवी अशा तिहेरी दृष्टीने या पुस्तकांची केलेली रचना जाणकारांना प्रतीत होईल.’
अत्रे वाङ्मय प्रदर्शन
पुण्यातील सुहास बोकील हे आचार्य अत्रे यांच्या वाङ्मयाचे संग्राहक आहेत. ते अत्रे वाङ्मयाचे प्रदर्शन भरवीत असतात. फेब्रुवारी २०१६ पर्यंत बोकील यांनी अशी ४२ प्रदर्शने भरवली आहेत. प्रदर्शनात अत्र्यांची पुस्तके, वर्तमानपत्रांत आलेल्या बातम्यांची कात्रणे, कागदपत्रे, अत्र्यांच्या हस्ताक्षरातील पत्रे, ऑडिओ-व्हीडिओ आदींचा समावेश असतो.
खूप छान
ReplyDeleteखुप छान महिती समजली
ReplyDeleteNice information
ReplyDeleteVery nice ☺️☺️
ReplyDeleteUseful information
ReplyDeleteKhupch chhan
ReplyDeleteप्रल्हाद केशव अत्रे यांच्या विषयी छान माहिती संकलित केली
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteGreat job summarizing information about Pralhad Keshav Atre! The information useful and well-presented. Keep up the good work!
ReplyDelete